Latest

IND vs ZIM : टीम इंडियाने दुबळ्या झिम्बाब्वेला चिरडले, 10 विकेट्स राखून विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य होते ते त्यांनी 30.5 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शिखर धवन आणि शुभमन गिल भारताच्या विजयाचे हिरो ठरले. धवनने 81 आणि गिलने 82 धावा केल्या. तत्पूर्वी, भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघाने भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आणि त्यांचा संघ 40.3 षटक 189 धावांवर गारद झाला.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघाने भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आणि त्यांचा संघ 40.3 षटक 189 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात तडीवानाशे मारुमणी आणि इनोसंट कैया यांनी केली. दीपक चहरने यजमान संघाला पॉवरप्लेमध्ये खिंडार पाडले. त्याने कैयाला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. झिम्बाब्वेला दुसरा धक्काही दीपक चहरने दिला. त्याने 8 धावांवर मारुमणीला सॅमसनकरवी झेलबाद केले. मोहम्मद सिराजने झिम्बाब्वेला तिसरा धक्का दिला. त्याने विल्यम्सला धवनकरवी झेलबाद केले. यानंतर झिम्बाब्वेला दीपक चहरने आणखी एक धक्का दिला. त्याने स्ले माधवेरेला एलबीडब्ल्यू बाद केले. झिम्बाब्वेचे इतर फलंदाजही फार काही करू शकले नाहीत. कृष्णाने बुरलेला बाद करून आपली दुसरी विकेट घेतली. भारताला नववे यश प्रसिद्ध कृष्णाने दिले आणि त्याने नागरवाला 34 धावांवर क्लीन बोल्ड केले. या सामन्यातील त्याची ही तिसरी विकेट होती. भारताकडून दीपक चहर, कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

भारताचा डाव, धवन आणि गिलची अर्धशतके

190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल आणि शिखर धवनने डावाची सलामी दिली. धवनने 76 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद 81 धावा फटकावल्या. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठरले. धवनने आपल्या डावात 113 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार मारले. तर गिलने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 82 धावांची खेळी केली. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक आहे. त्याने 72 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT