पुढारी ऑनलाईन डेस्क : सातारा जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. साडेअकराच्या दरम्यान, साताऱ्यात हे भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. ३.३ रिश्टर स्केल इतके या भूकंपाची तीव्रता आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भूकंपाचे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही.