Earthquake  
Latest

Nicobar Islands Earthquake: निकोबार बेटांवर ५.० रिश्टर स्केलचा भूकंप

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन अंदमान आणि निकोबार व्दिप समुहातील (Andaman and Nicobar islands) निकोबार बेटांवर आज (सोमवार) पहाटे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्‍केल नोंदवण्यात आली.

राष्‍ट्रीय भूकंविज्ञान केंद्रांनुसार, निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी मोजली गेली, आज सोमवार सकाळी 5.7 वाजता भूकंपाचे धक्‍के जाणवले.

रिश्टर स्केल म्हणजे काय? 

1935 मध्ये, अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ चार्ल्स एफ. रिक्‍टर यांनी एका उपकरणाचा शोध लावला. जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या भूकंपाच्या लहरींचा वेग मोजू शकतो. या यंत्राद्वारे भूकंपाच्या लहरींचे आकड्यांमध्ये रूपांतर करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT