Latest

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची बॉलिवूडमध्ये ५५ वर्षे पूर्ण; AI अवतारातील फोटो व्हायरल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीग बी अशी बिरूदावली मिळविलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला आज (दि.१७) ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. बच्चन यांनी आपल्या या प्रदीर्घ काळात बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त AI ने त्यांना एक खास भेट दिली आहे. याचा फोटो स्वतः बिग बींनी त्यांच्या इंस्टा वर शेअर केला आहे. Amitabh Bachchan

बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला फोटो AI ने तयार केला आहे. एआय तंत्रज्ञानाने बनवलेल्या या चित्रात बिग बींच्या डोक्यात कॅमेरे आणि फिल्म प्रोडक्शन मशीन भरलेली आहे. हा फोटो शेअर करताना, बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'चित्रपटाच्या या अद्भुत जगात 55 वर्षे… आणि AI ने मला खास भेट दिली आहे.' अभिनेत्री मौनी रॉयसह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी बिग बींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ५५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Amitabh Bachchan

Amitabh Bachchan : १९६९ मध्ये कारकिर्दीला सुरूवात

१९६९ मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांचे 'जंजीर', 'शोले', 'हेरा फेरी', 'परवरिश', 'त्रिशूल', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथनी', 'डॉन' असे अनेक सुपरहिट चित्रपट गाजले. बच्चन यांना या दीर्घ प्रवासात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांनी यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. प्रसिद्धीचे यशोशिखर त्यांनी गाठले, त्यामुळेच अमिताभ यांना शतकातील मेगास्टार असेही म्हटले जाते.

अमिताभ बच्चन यांचा वर्क फ्रंट

कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण होऊनही बिग बी चित्रपटांमध्ये अद्यापही सक्रिय आहेत. त्यांचे अनेक चित्रपट लाईमलाइटमध्ये आहेत. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी 'कल्की एडी 2898' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत साऊथचे सुपरस्टार कमल हसन आणि प्रभास देखील दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय बिग बी रिभू दासगुप्ताच्या सेक्शन 84 मध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर रजनीकांतसोबत वेट्टैयान या तमिळ चित्रपटातून बच्चन पुन्हा एकत्र येणार आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT