amitabh bachchan 
Latest

अमिताभ बच्चन यांचा केबीसीच्या सेटवर अपघात : रुग्णालयात दाखल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच 'कौन बनेगा करोडपती 14' या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले असून आता काळजी करण्यासारखे काही नाही. ते पूर्णपणे बरे आहेत. याबाबतची माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून दिली आहे.

धातूच्या धारदार वस्तूमुळे त्यांच्या डाव्या पायाच्या मागच्या बाजूची नस कापली गेली. त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्याच्या पायाला टाके पडले. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी बिग बींना त्यांच्या पायावर ढकलण्यास किंवा चालण्यास मनाई केली आहे. त्यांना ट्रेडमिलवर चालताही येत नाही.

अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. याबाबत स्वतः बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून खुलासा केला आहे. आपल्या पायाची नस कापली गेल्याने जखमेला टाके घालण्यात आले आहेत. आता आपण पूर्णपणे बरे झालो असून काळजीचे कोणतीही कारण नाही, अशी माहिती  बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन केबीसीच्या सेटवर जेवढा वेळ घालवतात, त्या काळात त्यांची विशेष काळजी घेतली जाते. नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त केबीसीच्या टीमने एका खास एपिसोडचे आयोजन केले होते. यात अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचाही सहभाग होता.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT