जळगाव : अमित शहा यांच्या दौऱ्या निमित्ताने जळगांव शहर भाजपमय झालेले पहावयास मिळत आहे. (छाया : नरेंद्र पाटील) 
Latest

Amit Shah in Jalgaon : अमित शाह जळगाव दौऱ्यावर

अंजली राऊत

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) भाजपा युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर येत आहेत. जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असला तरी विरोधकांना आगामी काळातील निवडणुकीत पूर्णपणे नामोहरम करण्याची भाजपाची रणनीती असल्याचे पाहायला मिळत आहे. अमित शहा जळगाव जिल्ह्यात प्रथमच येत असून त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरु असून ते यावेळी 25 हजार तरुणांशी मुक्त संवाद  साधणार आहेत. यामध्ये नवमतदार यांच्याकडेही देखील विशेष लक्ष दिले जाणार आहे. तर शहा यांच्या आगमनामुळे जळगावात सगळीकडे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.  (Lok Sabha Elections 2024)

एकंदरीतच जळगावमधील युवा संमेलनात अमित शाह काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता जळगाव मधील युवकांशी ते संवाद साधणार आहेत, तरूणांना विशेषत: नवमतदारांनाही आपल्यालाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून अमित शहा युवा संमेलनात सहभागी होत आहेत. शहा यांच्या दौऱ्या निमित्ताने जळगांव शहर भाजपमय झाले असून मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT