पुढारी ऑनलाईन डेस्क : ३०० फूट खोल दरीत पडून अमरनाथ यात्रेकरूचा शुक्रवारी मृत्यू झाला. विजय कुमार शाह असे मृताचे नाव आहे. तो बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुमारी नावाच्या अन्य यात्रेकरूंसोबत शाह पवित्र मंदिरातून परतत असताना कालीमाता मोरजवळ घसरले. यावेळी शहा यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यात्रेकरूंचा शोध घेत स्थानिक अधिकारी आणि भारतीय लष्कराने ही मोहीम सुरू केली आहे. शहा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आला.
दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंच गुहेची 62 दिवसांची वार्षिक तीर्थयात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटालच्या दुहेरी ट्रॅकपासून सुरू झाली. 31 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होणार आहे.