Almond Milk 
Latest

Almond Milk : बदामाच्या दुधाने होतात ‘हे’ लाभ…

Arun Patil

काही 'वेगन' लोक केवळ शाकाहारच घेतात असे नव्हे, तर कोणताही पशुजन्य आहार टाळतही असतात. त्यामध्ये अगदी दूध व दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश असतो. असे लोक गायी-म्हशीच्या दुधाऐवजी सोया मिल्क, अल्मंड मिल्क असे पर्याय निवडतात. 'अल्मंड मिल्क' Almond Milk म्हणजेच बदामाचे दूध वेगन लोकांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच चांगली निवड ठरू शकते. या दुधामुळे होणारे 'हे' काही लाभ…

पचनसंस्था : पचनसंस्था मजबूत करण्यासाठी बदामाच्या दुधाचे सेवन Almond Milk अतिशय लाभदायक ठरते. या दुधात फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनासाठी हितकारक आहे. बद्धकोष्ठता व गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी ते मदत करते.

हाडे : हाडे मजबूत करण्यासाठी बदामाचे दूध Almond Milk उपयुक्त आहे. त्यामध्ये 'ड' जीवनसत्त्व आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांच्या विकासासाठीही हे दूध उपयुक्त ठरते.

ऊर्जा : शरीरात ऊर्जा, शक्ती वाढवण्यासाठी बदामाचे दूध गुणकारी आहे. या दुधात Almond Milk अनेक जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे शरीर ऊर्जावान होते. थकवा, निरुत्साही वृत्ती दूर करण्यासाठी ते लाभदायक आहे.

डोळे : डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बदामाचे दूध Almond Milk गुणकारी आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई विपुल प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. दृष्टी सुधारण्यासाठी हे दूध गुणकारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT