Latest

Alia Bhatt : लग्नाआधीच अलिया भट्टनं दिली गुड न्यूज!

दीपक दि. भांदिगरे

बॉलिवू़डची सर्वांधिक प्रसिद्ध जोडी अलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरुच आहेत. जेव्हा दोघे जोधपूरला पोहोचले तेव्हा सगळ्यांना वाटले की ते लवकरच लग्न करणार आहेत. आता आलिया आणखी एका कारणामुळे चर्चेत आलीय. रणबीर सोबतच्या लग्नाआधी अलियाकडून एक गुड न्यूज आली आहे. कपूर कुटुंबासाठी ही गोष्ट अभिमानाची असल्याचे सांगितले जात आहे.

एका वृत्तानुसार, आलिया भट्ट (Alia Bhatt) एका अमेरिकन टॅलेंट एजन्सीच्या संपर्कात आहे. 'विलियम मॉरिस एंडेव्हर' (William Morris Endeavour) असे या एजन्सीचे नाव आहे. ही एजन्सी अलियाला हॉलिवू़डमध्ये संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अलियाला एका चांगली पटकथा हवी आहे. चांगली ऑफर मिळताच ती हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेंसची मोठी फॅन आहे. जेनिफर प्रमाणेच अलियाला चित्रपट करायचे आहेत. आलियाचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यावेळी अलियाला तिच्या हॉलिवूड पदार्पणाची घोषणा करण्याची इच्छा आहे. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या पटकथा आहेत. पण तिला हॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करायची आहे. त्यासाठी चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत आहे.

आलियाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअरट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, ऋषि कपूर, रणदीप हुड्डा, अर्जुन कपूर, रोनित रॉय, रितेश देशमुख, शाहिद कपूर, दिलजीत डॉसंज, रणबीर कपूर आणि शाहरुख खान सोबत काम केले आहे. अलिया सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. विशेष गोष्ट म्हणजे आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र' मध्ये एकत्र दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT