alia bhatt 
Latest

Alia Bhatt : आलिया भट्टने लंडनमध्ये गायिले ‘इक कुडी’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्टने ( Alia Bhatt ) नुकतेच लंडनमध्ये झालेल्या 'होप गाला' या चॅरिटी सोहळ्यात हजेरी लावली होती. आता तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती या कार्यक्रमात गायिका हर्षदीप कौरसोबत 'इक कुडी' हे गीत गाताना दिसत आहे. हे गाणे 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उडता पंजाब' या सिनेमातील आहे.

आलियाने ( Alia Bhatt ) या सिनेमाच्या संगीत अल्बमसाठी गायक/अभिनेता दिलजित दोसांझसोबत या गाण्याचे क्लब मिक्स व्हर्जनही गायिले आहे. लंडनच्या मंदारिन ओरिएंटल हाईड पार्कमध्ये झालेल्या या सोहळ्यात आलिया दोन लूकमध्ये दिसली. रेड कार्पेट सोहळ्यात आलिया एका डिझायनर वन पीस लूकमध्ये दिसली. मुख्य सोहळ्कायासाठी तिने सेलिब्रिटी डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांची विंटेज साडी घातली होती.

हाताने बनवलेली फ्लोरल सिल्क साडी 1994 मध्ये तयार केली होती. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आलिया म्हणाली की, ही संध्याकाळ विशेष होती. कारण, ती खूप प्रेम, उद्देश आणि आशेने भारलेली होती. कार्यक्रम होस्ट करताना मला खूपच आनंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT