पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे आणखी एक फेमस कपल रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali-Richa Wedding) विवाहबंधनात अडकले. या कपलने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत निकाह केला. सोशल मीडियावर दोघांनी अनेक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन झाले होते. गुरुवारी दिल्लीत दोघांची हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. समोर आलेल्या नव्या फोटोंमध्ये अली-ऋचाने ऑफ व्हाईट कलरच्या सुंदर आऊटफिटमध्ये दिसत आहे. अलीने व्हाईट शेरवानी परिधान केली होती. ऋचा चड्ढाने ऑफ व्हाईट हेवी शरारा परिधान केला होता. त्यावर ग्रीन कलरची कुंदन ज्वेलरी घातली होती. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. हे फोटो शेअर करताना अलीने लिहिलंय- एक दौर हम भी हैं…एक सिलसिला तुम भी हो. (Ali-Richa Wedding)
रिचा चड्ढा-अली फजलने आपलया प्री-वेडिंग फंक्शनमध्ये धमाकेदार डान्स केला होता. त्याची एक झलक त्याने इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केली होती. पेस्टल कलरच्या लहंग्यात आणि लाईट मेकअपमध्ये ऋचा खूप सुंदर दिसतेय. ऋचाची मेहंदी आणि हळदी सेरेमनी धमाकेदार झाला.
रिचा चड्ढा-अली फजलची लव्ह स्टोरी चित्रपट 'फुकरे'च्या सेटवर सुरू झाली होती. दोघे एकमेकांशी पहिल्यांदा या सेटवर भेटले होते. अलीला रिचाला भेटल्यानंतर प्रेम झालं होतं. पण, रिचाने आधी अलीला प्रपोज केलं होतं. २०१७ मध्ये दोघांनी आपल्या नात्याविषयी खुलासा केला होता.