Ajit Pawar 
Latest

अजित पवार म्हणतात, त्या दिवसापासून ठरवलंय; आता बोलताना चुकायचं नाही म्हणजे नाही

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं. बाबांनो मी लय खबरदारी घेतोय. एकदाच चुकलोय, त्याची जबरदस्त किंमत चुकवली आहे. चूक झाल्यानंतर दिवसभर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर दिवसभर बसलो होतो. आणि म्हणत राहिलो की, आता चुकायचं नाही. त्या दिवसापासून बोलताना मी चुकलो नाही. तुम्ही कितीही टाळ्या वाजवून माझं कौतुक करा. पण मी चुकणार नाही. नाहीतर होतं कसं, कार्यकर्त्यांनी जास्त कौतुक केलं की, भावनांच्या भरात अनेक नेते चुकीचं बोलून जातात. परंतु माझ्यासोबत असं झालं की, मी माझ्या आतल्या दुसऱ्या मनाला सांगतो, बोलताना आपण चुकायचं नाही… चुकायचं नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनीपिंपरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

सकाळी लवकर येतो कारण

अजित म्हणाले की सकाळी लवकर येतो कारण मला जे अपेक्षित असतात त्याच व्यक्ती उपलब्ध होतात. विनाकारण गर्दी होत नाही, लवकर येऊन लवकर गेलो की रस्ते मोकळे होतात. पण मी आज अर्धा तास आधी आलो. मी आयुक्त राजेश पाटलांनाही याबाबत कल्पना दिली नव्हती. पण हा बाबा माझ्या अगोदर अर्धा तास येऊन थांबला होता. कारण आयुक्तांना माहितेय, मी लवकरच येतो. लवकर येण्यामागचा माझा एकदम हेतू शुद्ध असतो. मला माझ्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आवडत नाही.

कार्यकर्त्यांनी घराघरात राष्ट्रवादी पक्ष पोहचवा. पण आपल्या सर्व कार्यकर्त्याने अगोदर स्वतःच्या मनात पक्ष भिनवायला हवा. नाहीतर कार्यकर्ताच गोंधळलेल्या मनस्थितीत असला की, लोक म्हणतात ह्याचं काय ठरेना अन् हा आपल्याला सांगतोय. राष्ट्रवादीची महाविकासआघाडी करायची तयारी आहे. पण व्यवहाराने जागांची मागणी करावी, एकदम अव्वाच्या सव्वा मागणी करू नका. जर असं झालं तर नाईलाजास्तव मला एकला चलो रे चा नारा द्यावा लागेल. सध्या माझी कोणतीही तशी अजिबात इच्छा नाही. माझी आघाडीचीच मानसिकता आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

आता मी पद वाटप करतोय. पण यातील कोणाला तिकीट मिळेल किंवा मिळणारही नाही. जर तिकीट मिळालं नाही म्हणून मी पक्षाचं काम करणार नाही. असं कुणी करणार असेल तर मग मी दिलेलं पदच काढून घेणार, असा इशारा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT