saithan 
Latest

saithan : अजय देवगणच्या ‘शैतान’ मध्ये माधवनचीच दहशत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण, आर. माधवन आणि दाक्षिणात्य स्टार ज्योतिका यांचा 'शैतान' ( saithan ) सिनेमा नुकताच रीलिज झाला आहे. हॉरर ड्रामा असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर खूपच गाजला. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. सिनेमात आर. माधवनने अजयपेक्षा दमदार भूमिका केल्याचे दिसून येत आहे.

सिनेमात त्याची दहशत असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा रीलिज झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आला आहे. देशासह विदेशातही त्याची चर्चा रंगली आहे. 'शैतान' हा सिनेमा 'वश' या गुजराती सिनेमाचा रिमेक आहे.

'शैतान'  ( saithan ) ने रीलिज होण्यापूर्वीच 1.76 लाखांपेक्षा अधिक कमाई केली होती. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याने पहिल्या दिवशी केवळ 8 ते 12 लाखांच्या आसपास कमाई केल्याचे सांगितले जात होते. अजयने हा सिनेमा 60 ते 65 कोटी रुपये खर्च करून तयार केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे हा सिनेमा आता नेमक्या किती कोटींची कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT