Latest

Mumbai Air Hostess Murder Case : हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या

Arun Patil

मुंबई : पवई भागातील मरोळ येथील अपार्टमेंटमध्ये रूपल ओगरे या हवाई सुंदरीची (Mumbai Air Hostess Murder Case) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हवाई सुंदरी मूळची रायपूर (छत्तीसगड) येथील असून, ती येथे भाड्याच्या सदनिकेत बहीण व मैत्रिणींसह राहत होती.

हत्या झाली त्या दिवशी रूपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर मैत्रिणी गावी गेलेल्या होत्या. रूपलला रायपूरहून तिचे कुटुंबीय सारखे फोन करत होते आणि ती उचलत नव्हती. काळजीपोटी कुटुंबीयांनी मुंबईतील तिच्या एका मैत्रिणीला फोन केला व माहिती काढण्यास सांगितले. नंतर ही मैत्रीण रूपलच्या फ्लॅटवर पोहोचली. तिने बराच वेळ दार ठोठावले; पण प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने दरवाजा तोडला.

रूपलचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत फ्लॅटमध्ये अस्ताव्यस्त पडलेला होता. माहिती कळताच पवई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तपास सुरू असून, अपार्टमेंटमधील सफाई कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Mumbai Air Hostess Murder Case)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT