Latest

AIIMS ransomware attack : ‘एम्सच्या सर्व्हर हॅकिंगमागे’ चिनी कारस्थान

backup backup

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली एम्सच्या सर्व्हरच्या हॅकिंग प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी चीनवर बोट ठेवत त्यांनी ड्रॅगनवर कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. एम्सचे पाच सर्व्हर हॅक करण्यात आले होते आणि डेटा लीक करण्यात आला आहे. (AIIMS ransomware attack)

एम्सचा डेटा डार्क वेबच्या मुख्य डोमेनवर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह लाख रुग्णांचा गुप्त डेटा लीक होण्याची शंका उपस्थित केली जात आहे; मात्र याबाबत प्रशासनाने इन्कार केला असून सर्व डेटा सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. हा इंटरनेट सर्चिंगचा भाग असून सामान्यपणे असा डेटा सर्च इंजिनवर शोधला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची साईट उघडण्यासाठी विशेष ब्राऊझरची गरज असते. त्याला टॉर असे म्हटले जाते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. डार्क वेब साईटला टॉर एन्क्रिप्शन टूलच्या मदतीने लपविले जाते; मात्र या साईटवर हॅकर्स चुकीच्या पद्धतीने पोहोचल्यास डेटा चोरीचा मोठा धोका वाढत असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. (AIIMS ransomware attack)

सायबरतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचे दोन रॅनसमवेअर एम्परर ड्रॅगनफ्लाई आणि ब्रांझ स्टारलाईटचा (डीईव्ही-0401) या प्रकरणाच्या मागे हात असण्याची शक्यता आहे; मात्र त्याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. दुसरा संशय लाईफ नावाच्या एका ग्रुपवर व्यक्त करण्यात आला आहे. जे वानारेन नावाच्या रॅनसमवेअरचे एक नवे व्हर्जन आहे.

डेटा डार्क वेब टाकण्यास सुरुवात

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हॅकर्सनी विक्रीसाठी हा डेटा डार्क वेब टाकण्यास सुुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक करणार्‍यांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्याचे पेमेंट क्रिप्टोकरन्सीद्वारे करण्याचे आवाहन केले होते; मात्र हॅकर्सनी कोणत्याही प्रकारची खंडणी मागितली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT