पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच युग तंत्रज्ञानाचं आहे. मात्र, तंत्रज्ञाच्या मदतीने सध्या अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयच्या माध्यमातून प्रेझेंट केलेल्या व्हाईसला एक महिला बळी पडली आहे. एका ५९ वर्षीय महिलेची १.४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. प्रभाज्योत असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
एआयच्या माध्यमातून तिच्या कॅनडामध्ये राहणाऱ्या पुतण्याचा आवाजाची नक्कल करण्यात आली. यामध्ये फसवणूक करणाऱ्या आरोपीने आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याचा दावा केला. रात्री उशिरा ही प्रकरण उघडकीस आले. जेव्हा प्रभज्योतला कॉल आला जो सुरुवातीला तिच्या कॅनडामधील पुतण्याकडून होता.
प्रभाजोत म्हणाली, "तो अगदी माझ्या पुतण्यासारखा वाटत होता आणि आपण घरी ज्या पंजाबीमध्ये बोलतो त्यामध्ये तो अगदी बारकाईने बोलत होता. त्याने मला रात्री उशिरा फोन केला आणि सांगितले की त्याचा अपघात झाला आहे आणि त्याला तुरुंगात टाकले जाणार आहे. त्याने मला पैसे ट्रान्सफर करून ठेवण्याची विनंती केली," दुर्दैवाने, प्रभज्योतला कॉलचे फसवे स्वरूप लक्षात येईपर्यंत, तिने फसव्या कॉलरच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते.