वॉशिंग्टन : एखादा इंजिनिअर रोबो बनवतो किंवा त्यामधील सॉफ्टवेअर बनवतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता एक रोबोच सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला आहे. अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने 'डेविन' नावाचा एक एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवला आहे.
हे एक नवे 'एआय' टूल आहे. अमेरिकन एआय लॅब कॉग्निशनने ते तयार केले आहे. हा जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोडिंग, वेबसाईट आणि कोडिंग प्रोग्रॅमरची अनेक कामे तो सहजपणे करू शकतो. हा एआय इंजिनिअर त्याच्या सहकार्यांनाही मदत करू शकतो. अर्थातच तो एक कुशल 'एआय इंजिनिअर' आहे. गरज भासल्यास तो संपूर्ण प्रोग्रॅमचे काम एकटा करू शकेल. एका सुप्रसिद्ध कंपनीने घेतलेल्या अभियांत्रिकी मुलाखतीत तो उत्तीर्ण झाला आहे. त्याच्यामध्ये अनेक फीचर्स असून तो अनेक कठीण कामे करू शकतो. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कोडिंग, डीबगिंगसारखी कामे करू शकतो. डेव्हिनमध्ये मशिन लर्निंग अल्गोरिदम वापरण्यात आले आहे. त्यामुळे ते सतत शिकत राहते आणि त्याच्या कामात सुधारणा होते.