Latest

लिझ ट्रस पंतप्रधान पदावरुन पायउतार होताना सुनक यांच्याबद्दल म्हणाल्या…

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनच्या मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आज १० डाउनिंग स्ट्रीट बाहेर निरोपाचे भाषण केले. त्यात त्यांनी देशाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले. त्यांच्या सरकारने कष्टकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी तात्काळ आणि निर्णायकपणे काम केले असल्याचे सांगत त्यांनी ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मतदारसंघात आता अधिक वेळ देणार असल्याच्या त्या म्हणाल्या. त्यानंतर ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा सुर्पूद केला.

ट्रस यांनी औपचारिकरित्या राजीनामा देण्यापूर्वी निरोपाचे भाषण केले. यावेळी भाषण करताना त्यांनी उत्तराधिकारी ऋषी सुनक यांचे सत्तेत असताना केलेल्या कामगिरीबद्दल तोंडभरून कौतुक केले. तसेच त्यांना पुढच्या "प्रत्येक यशासाठी" शुभेच्छाही दिल्या. राजीनाम्यानंतर आपल्या मतदारसंघात आता अधिक वेळ देणार असल्याचेही ट्रस म्हणाल्या. त्यानंतर ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा सुर्पूद केला.

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही सातत्याने वादळांशी लढत आहोत. पण माझा ब्रिटनच्या लोकांवर विश्वास आहे. इथून पुढे चांगले दिवस येतील याचीही मला खात्री आहे. पुतीन यांच्या आक्रमकतेविरुद्धच्या धाडसी लढ्यात आपण युक्रेनला पाठिंबा दिला पाहिजे. या महायुद्धात युक्रेन विजयी झाला पाहिजे आणि आपण आपल्या देशाचे संरक्षण मजबूत करणे सुरूच ठेवले पाहिजे. हेच साध्य करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ऋषी सुनक यांना आपल्या देशाच्या भल्यासाठी प्रत्येक यशासाठी मी शुभेच्छा देतो, असेही त्या म्हणाल्या.

लिझ ट्रस यांनी ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा

लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) सुनक यांची यूकेच्या पंतप्रधानपदी निवड झाली. सुनक यांची ब्रिटिश पंतप्रधानपदी निवड होताच, माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुनक यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि आमचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन. तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी अधिकृत घोषणा…

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) यांची आज (दि.२५) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स III यांनी अधिकृत घोषणा केली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हुजूर पक्षाचे नेते (Conservative Party leader) ऋषी सुनक यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित केले. त्यानंतर किंग चार्ल्स यांच्याकडून सुनक यांची अधिकृतरित्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. ऋषी सुनक हे ब्रिटनचे ५७ वे पंतप्रधान बनले आहेत. ते या वर्षीचे तिसरे पंतप्रधान आहेत आणि दोन शतकांतील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी १० डाउनिंग स्ट्रीटवर प्रवेश केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT