PM Narendra Modi with African-American singer Mary Millben  
Latest

Mary Millben : आफ्रिकन-अमेरिकन गायिकेने पंतप्रधान मोदींचे केले चरणस्पर्श (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी वॉशिंग्टन, डीसी येथे भारताचे राष्ट्रगीत गायिले. (Mary Millben ) रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये येथे हा कार्यक्रम झाला. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनसमुदायाला संबोधित केले. विशेष म्हणजे 'जन गण मन' म्हणत मेरीने पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद मागितला. हा खास क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Mary Millben )

मेरीने एएनआयशी संवाद साधत पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. ती म्हणाली, "येथे येण्याचा मला खूप सन्मान वाटतो. पंतप्रधान इतके अद्भुत आणि दयाळू व्यक्ती आहेत. या आठवड्यात त्यांच्या राज्यभेटीचा एक भाग बनणे हा सन्मानाचा विषय होता. मला इतक्या लोकांकडून राष्ट्रगीत ऐकताना खूप आवडले. तुम्ही ते ऐकू शकता. त्यांचा सर्व आवाज. आज रात्री इथे येण्याचा खरा सन्मान आहे."

अलीकडेच, मेरीने यूएन मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसोबत योगासने केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT