Afghanistan Earthquake 
Latest

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंप; मृतांचा आकडा २ हजारांवर; घरांची पडझड, तालिबानने मागितली मदत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क:  पश्चिम अफगाणिस्तानतील शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण अफगाणिस्तानला हादरवून सोडले आहे. अफगाणिस्तानात शनिवारी झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंप झाला. या जोरदार भूकंपातील मृतांचा आकडा २ हजारांवर पोहोचला आहे. तीव्र भूकंपाने येथील इमारती पडल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. दरम्यान अनेक घरांची पडझड झाली. तालिबानने येथील लोकांना वाचवण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी स्थानिक संघटनांची मदत मागितली आहे, असे वृत्त 'द असोसिएशन प्रेस' या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अमेरिकेन जिओलॉजिकल सव्र्हेने दिलेल्या माहितीनुसार,  हेरात शहरापासून ४० कि.मी. अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. पहिला धक्का सकाळी ११ वाजता बसला. ६.३ क्षमतेच्या धक्क्याने इमारती हलू लागल्या. भीतीने नागरिक घराबाहेर आले. पण तीन तासांत पाठोपाठ सात धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रताही ४.६ ते ६ रिश्टरची होती. यामुळे अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. तसेच अनेक ग्रामीण व डोंगराळ भागात भूकंपामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. या भूकंपातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. (Afghanistan Earthquake)

Afghanistan Earthquake: शक्तिशाली भूकंपात सहा गावे उद्ध्वस्त

देशाच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपातील मृतांची संख्या मूळ नोंदवली गेली आहे. सुमारे सहा गावे उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यांनी इतर देशांना तातडीच्या मदतीसाठी आवाहन केले आहे, असे वृत्त देखील येथील माध्यमांनी दिले आहे.

Afghanistan Earthquake: 30 मिनिटांत पाच आफ्टरशॉक

अफगाणिस्तानच्या हेरात शहरात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, यामध्ये २ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे भूस्खलन आणि इमारती कोसळून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हेरातच्या भूकंपानंतर 30 मिनिटांच्या कालावधीत अनुक्रमे 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 तीव्रतेचे पाच आफ्टरशॉक बसले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT