पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या महाराष्ट्रात Vedanta-Foxconn वेदांताचे फॉक्सकॉनच्या प्रकल्पांवरून मोठे राजकारण तापले आहे. विरोधकांनी वेदांताचे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल सरकारला धारेवर धरले आहे. गेल्या दोन तीन दिवस सुरू असलेल्या या प्रकरणावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी गुजरातमध्ये प्रकल्प करण्याचा निर्णय जुलै महिन्यातच झाला असून संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार आहे, असे ट्विट केले. सध्या देवेंद्र फडणवीस हे रशियात आहे. त्यांनी ट्विटरवरून वेदांताचे संलग्न प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबदद्ल कंपनीचे आभार मानले. तर विरोधकांच्या नकारात्मक राजकारणावर जोरदार हल्ला चढवला.
Vedanta-Foxconn देवेंद्र फडणवीस ट्विट करून म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू.
Vedanta-Foxconn वेदांताचे आभार मानण्यापूर्वी फडणवीसांनी विरोधकांवर चांगलाच प्रहार केला. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत.
माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !
असे ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. तत्पूर्वी वेदांता फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की,
"Vedanta-Foxconn वेदांत-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात २ वर्षांपूर्वी केली होती.
आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये उदा., गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इ. ठिकाणी गेल्या 2 वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी संलग्न आहोत आणि आम्हाला उत्कृष्ट पाठिंबा मिळाला आहे.
त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आम्ही काही महिन्यांपूर्वी गुजरातचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरात निवडला
ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतातील इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल, असे ट्विट वेदांता फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले.
हे ही वाचा :