पुढारी ऑनलाईन डेस्क : एडल्ट फिल्म स्टार सोफिया लियोनीचे निधन झाले. ती २६ वर्षांची होती. (Sophia Leone Death) अभिनेत्रीच्या निधनावर तिच्या सावत्र वडिलांनी एका स्टेटमेंट जारी करून निधनाची पुष्टी केली आहे. सावत्र वडिलांचे म्हणणे आहे की, सोफिया अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. सोफियाच्या निधनाने तिच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. (Sophia Leone Death)
अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यात एडल्ट स्टार सोफिया लियोनीचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क पोस्ट रिपोर्टनुसार, सोफियाच्या अपार्टमेंटमधून तिचा मृतदेह सापडला होता. परंतु, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोरी आणि हत्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिस सोफियाच्या मृत्यूचा तपास करत आहेत.
सोफियाने १०१ मॉडलिंग कंपनीसोबत काम केले आहे. कंपनीने देखील सोफियाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आतापर्यंत ८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोफियासोबत काम करणाऱ्या लोकांनीही तिच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
सोफियाच्या आधी एडल्ट स्टार्स कॅग्ने लिन कार्टर, जेस्सी जेन, थायना फील्ड्सचा मृत्यू झाला होता. कॅग्ने कार्टरने फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो मानसिक तणावात होता. त्यानंतर ओहायोमध्ये त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला होता.