औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि बॉडीगार्ड यांच्यात बाचाबाची झाली. शिवसेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांना बॉडीगार्डने धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार आदित्य ठाकरे यांच्या समोरच झाला असल्याची माहिती मिळत आहे.
शिंदे-फडणवीस सरकार विराजमान होत असताना गेले महिनाभर राज्यात सत्तानाट्य रंगले. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ते अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील. या पार्श्वभूमिवर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे. ते दोन दिवस शिव संवाद मेळाव्यानिमित्त औरंगाबादेत आले होते. रात्री मुक्कामी थांबल्यानंतर ते सकाळी पैठणमार्गे शिर्डीकडे रवाना झाले. त्याआधी शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आदित्य यांनी अपवाद वगळता कोणालाही भेट दिली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी आदित्य यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता आदित्य यांचे अंगरक्षक आणि स्वामी यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी स्वामी यांना अगरक्षकाने धक्काबुक्की केल्याचीही माहिती मिळाली आहे.
हेही वाचा :