सनी लिओनी  
Latest

Cannes 2023: अदिती राव ते सनी लिओनी रेड कार्पेटवर उतरणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुप्रतीक्षित कान्स सुरु झाला आहे. (Cannes 2023) चाहत्यांनाही कोण कोण भारतीय सेलिब्रिटी रेड कार्पेटवर उतरणार, याचे अपडेट बघण्यासाठी सुरूवात केली आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या फॅशनसोबत कान्सचा रेड कार्पेट या अभिनेत्री अनुभवणार आहेत. सनी लिओनी पासून ते आदिती राव हैदरी, अनुष्का शर्मा या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास सज्ज आहेत. (Cannes 2023)

पहिल्या दिवशी सारा अली खान, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर, उर्वशी रौतेला यांनी रेड कार्पेटवर ग्लॅमरचा तडका लावला. आता अदिती, अनुष्का यांची प्रतीक्षा चाहते करत आहेत.

अदिती राव हैदरी:

अदिती राव हैदरी हिने २०२२ मध्ये कान्समध्ये पदार्पण केले होते आणि तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा तेव्हा झाली होती. यंदा अदिती कान्ससाठी काय वेगळं करणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. २०२३ च्या कान्स लूकसाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

अनुष्का शर्मा:

अभिनेत्री यावर्षी पदार्पण करताना दिसणार आहे आणि सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये अनुष्कासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. रिपोर्ट्सनुसार, ती या खास इव्हेंटचा भाग असणार असून सिनेमातील उत्कृष्ट महिलांचा सन्मान करणार आहे. अनुष्का हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटसोबत स्टेज शेअर करणार असल्याचं समजतंय.

सनी लिओनी:

प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये मध्यरात्रीच्या स्क्रिनिंगसाठी सनी लिओनीच्या आगामी मर्डर केमस्ट्री केनेडीची निवड करण्यात आली आहे. स्क्रिनिंगपूर्वी, अभिनेत्रीने चित्रपटाचा टीझर आला असून या चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे.

कान्स १६ ते २७ मे दरम्यान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT