rukmini maitra  
Latest

rukmini maitra : अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा साकारणार ‘नटी बिनोदिनी’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र 'नटी बिनोदिनी' या आगामी बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (rukmini maitra ) 'देव एन्टरटेनमेन्ट व्हेंचर" हे चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. तर निर्मिती शैलेंद्र कुमार, सूरज शर्मा आणि प्रतीक चक्रवर्ती करणार आहेत. (rukmini maitra )

शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बहुचर्चित बायोपिक 'बिनोदिनी एकटी नटीर उपाख्यान' मधील मुख्य कलाकारांची घोषणा केली. बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा ही बहुचर्चित भूमिका साकारणार आहेत.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझर पोस्टरचे अनावरण केले. त्या पोस्टरवर रुक्मिणी मैत्रा या श्री चैतन्य महाप्रभू यांच्या भूमिकेत दिसत आहेत. बिनोदिनी दासी यांनी श्री चैतन्य महाप्रभू यांची व्यक्तिरेखा रंगभूमीवर साकारली होती. मोशन पोस्टर हे एकता भट्टाचार्य यांनी डिझाईन केले आहे. त्यास नीलायन चॅटर्जी यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रियांका पोद्दार यांनी लिहिले आहेत. "मला कायमच बंगाली प्रेक्षकांसाठी बिनोदिनी दासी यांची प्रभावित करणारी कथा सांगायची होती. अशा सांगितिक चित्रपटाकरिता मला अपेक्षित असलेले बजेट मिळवण्याकरिता मला जवळजवळ दोन वर्षे संघर्ष करावा लागला.

या सर्व प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रुक्मिणी मैत्रा.

'सिझन्स ग्रिटींग्स' आणि 'एक दुआ' मधील माझे काम त्यांनी पाहिलेले होते आणि त्यामुळेच बंगाली रंगभूमीवरील मेगास्टारच्या वेदना आणि तो प्रवास मी हाताळू शकेन, असा मैत्रा यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. रुक्मिणी माझी बिनोदिनी होईल याचा मला आनंद आहे,' असे बॉलीवूड चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी म्हणतात.

या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार गिरीश घोष, अमृतलाल, ज्योतिंद्रीनरथ, रामकृष्ण, कुमार बहादूर आणि रंगा बाबू हे दिसणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT