Latest

Hruta Durgule Wedding : ऋता दुर्गुळेने प्रतिक शाह सोबत गुपचुप आवरलं शुभमंगल!

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'मन उडू उडू' आणि फुलपाखरु फेम मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule Wedding) सर्वांना धक्का देत बुधवारी (दि.१८) अगदी गुपचुप विवाह बंधनात अडकली. प्रतिक शाह याच्यासोबत अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ती विवाह बंधनात अडकली. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर वरील अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करुन या बाबतची माहिती दिली. डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा झाला होता आणि बुधवारी तिने प्रतिक सोबत लग्न करत सर्वांनाचा सुखद धक्का दिला.

मराठी टेलिव्हिजन जगतातील गोंडस अभिनेत्री म्हणून ऋताने (Hruta Durgule Wedding) आपली वेगळी ओळख बनवली आहे. या आधी 'फुलपाखरु' या मालिकेद्वारे ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचली. त्यानंतर सध्या झी मराठी वाहिनीवर 'मन उडू उडू' या मालिकेद्वारे तिने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. या मालिकेतील अभिनयाने तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत. याशिवाय ती समाजमाध्यमांवर देखिल खूप ॲक्टीव असते.

ऋताने (Hruta Durgule Wedding) प्रतिक शाह सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. यानंतर तिने डिसेंबरमध्ये प्रतिक शाह सोबत साखरपुडा देखिल केला होता. इन्स्टाग्रामवर तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. ती नेहमी आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. तसेच बुधवारी तिने गुपचुप लग्न करत पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे.

यावेळी ऋता (Hruta Durgule Wedding) व प्रतिक पारंपरिक वेशभूषेत दिसले. दोघे अत्यंत देखणे व सुंदर दिसत होते. दोघांच्या चेहऱ्यावरील हास्यच या क्षणाचे महत्त्व विषद करत होते. ऋता सिल्क साडीमध्ये उठून दिसत होती तर प्रतिक पांढऱ्या रंगाच्या शेरवानी अत्यंत रुबाबदार दिसत होता. ऋताने 'दुर्वा' या मालिकेद्वारे मराठी टीव्हीमध्ये पदार्पण केले. लवकरच ती प्रताप फड यांच्या 'अनन्या' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

कोण आहे तिचा पती प्रतिक शाह ?

प्रतिक एक टीव्ही दिग्दर्शक आहे. त्याने बेहद २, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम, रंग प्यार के ऐसे भी या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह या देखिल लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT