Janhvi Kapoor  
Latest

Janhvi Kapoor : जान्हवी पुन्हा एक्स बॉयफ्रेंडला करतेय डेट?; चर्चांना उधान (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) नेहमी हॉट आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या जान्हवी दिवाळीच्या पार्ट्या एन्जॉय करत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी बोल्ड फोटोमुळे नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तर जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावरून जान्हवी पुन्हा एक्स बॉयफ्रेंडला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

जान्हवी कपूर नुकतेच लेखक-निर्माता अमृत पाल बिंद्रा यांच्या दिवाळी पार्टीसाठी तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर परिहारसोबत पोहोचली आहे. यावेळी जान्हवीने (Janhvi Kapoor) सिमर कलरची साडी परिधान केली असून ती कारमध्ये बसलेली दिसतेय. तर शिखर परिहार हा कार चालवत असताना दिसतोय. याशिवाय दोघांच्या पाठीमागे आणखी एक व्यक्ती मागच्या शिटवर बसलेलीदेखील दिसतेय. अमृत पाल याच्या पार्टीला जान्हवीला सोडायला तिचा बॉयफ्रेंड आल्याचे समजत आहे. यावेळीच जान्हवी आणि शिखर यांच्यावर पापराझीची नजर पडली. यावेळी जान्हवी कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. यावरून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. यात एका युजर्सने 'जान्हवी पुन्हा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करत आहे काय?' असा सवाल उपस्थित केला आहे. यावरून जान्हवी कपूर आणि शिखर परिहार दोघेजण पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याचा कयास चाहत्यांनी लावला आहे. परंतु, यातील काय सत्य आहे? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.

शिखर परिहार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूरसोबत काम करत आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT