Hardeek Joshi  
Latest

Hardeek Joshi : आता मज्जा येणार!; राणादा दिसणार ‘जाऊ बाई गावात’ या नव्या मालिकेत!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर सर्वाचा लाडका 'राणादा' म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. हार्दिकचा 'जाऊ बाई गावात' ही नवी मालिका चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

संबंधित बातम्या 

सोशल मीडियावर शेअर झालेल्या प्रोमोमध्ये हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) गावाकडच्या एका मुलाची भूमिका साकारत आहे. यावेळी त्याच्या कुंटूबात एक सुंदर अशी मुलगी येते. आणि तिला घरातील जेवण बनवणे आणि शेणाने घर सारवणे यासारखी कामे करावी लागतात. परंतु, त्या मुलीला चुलीच्या लाकडाचा धूरामुळे तिला जेवण बनवता येत नाही. किंवा तिला घरं सावरंण जमत नाही. तेव्हा हार्दिक जोशी म्हणतो की, शेणानं घर सावरणं निलपेंट लावण्या इतकं सोपं नाही करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार. याशिवाय तिला शेळ्या, मेंढयासोबतदेखील झोपावे लागते. यासारख्या अनेक अडचणींचा सामना तिला करावा लागत असल्याचे दाखविण्यात आलं आहे.

हा प्रोमो रिलीज झाल्यावर सोशल मीडियावरील चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. हा कार्यक्रम नक्की कोणता आहे?, रिऍलिटी शो की नवी मालिका?. यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले आहेत. मात्र, ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान पुन्हा एकदा राणादा म्हणजे, हार्दिक जोशीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र, उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT