Latest

अनुष्का शर्माने पूर्ण केली विराटची इच्छा, शेवटी मुंबईत सापडले….

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला छोले-भटुरे खूप आवडतात. हे त्याच्या प्रत्येक चाहत्यांना माहीत आहे, विराट जेव्हा दिल्लीत राहत होता तेव्हा त्याने भरपूर छोले-भटूरेंचा अस्वाद घेत होता. पण मुंबईला राहायला आल्यावर विराटला दिल्लीचे छोले-भटुरे आठवू लागले. विराटला मुंबईत राहून बराच काळ लोटला, पण त्याला दिल्लीसारखे छोले-भटुरे खायला मिळत नव्हते, मात्र आता विराटची पत्नी अनुष्का शर्माने त्याची जुनी इच्छा पूर्ण केली आहे. या अभिनेत्रीला दिल्लीसारखे छोले-भटुरे मुंबईत सापडले आहेत. याचा खुलासा खुद्द अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून केला आहे. अनुष्काने सांगितले की, दिल्लीच्या लोकांसाठी मुंबईतही छोले-भटूरे मिळत आहेत.

अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे

इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना अनुष्काने लिहिले की, आमच्या घरासाठी हा खूप मोठा दिवस आहे. कधीही न संपणारा शोध संपला. दिल्लीप्रमाणे मुंबईत छोले-भटूरे मिळण्याचे ठिकाण सापडले आहे. अनुष्काने लिहिले की, आज मी माझ्या पतीला खूप आनंद दिला आहे. चिट मिल करताना त्यांना अजिबात अपराधी वाटणार नाही. पुढे अनुष्काने असेही लिहिले की, मुंबईत दिल्लीसारखे छोले-भटुरे खाल्ल्यानंतर विराटला वाटेल की, मुंबईने शेवटी त्याच्यासाठी काहीतरी केले आहे.

तुम्हालाही दिल्लीप्रमाणे मुंबईतील छोले-भटुरेची चव चाखायची असेल, तर अनुष्काने दुकानाचे नावही लिहिले आहे. 'दिल्ली से' दुकानात जाऊन तुम्ही छोले-भटूरे मस्त खाऊ शकता. फक्त छोले-भटुरेच नाही तर इथे तुम्ही पराठे आणि अमृतसरी छोले देखील ट्राय करू शकता. यानंतर मात्र, अनुष्का शर्माचे आभार मानायला विसरू नका. किमान खाद्यप्रेमींना तरी हे लक्षात असेल.

तीन वर्षापूर्वी विराटने खाल्ले होते छोले भटुरे

एकदा एका मुलाखतीत विराट कोहलीला विचारण्यात आले की, तुम्ही तुमचा आवडता छोले-भटुरे शेवटचे कधी खाल्ले होते, तेव्हा तो म्हणाला, 'मला छोले-भटुरा खाऊन तीन वर्षे झाली आहेत. तो म्हणाला होता, मला माझ्या करिअरमध्ये पूर्ण प्रामाणिकपणे पुढे जायचे आहे. चांगले खेळणे हे माझे प्राधान्य आहे. नंतर मी माझे आवडते पदार्थ खाऊ शकतो. मला आवडलेले पदार्थ खाण्यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ आहे. पण सध्या मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT