पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) कामातून सुट्टी घेत रविवारचा संडे निवांत घालवताना दिसली. या सुटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृताच्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ने लेटेस्ट इंन्स्टाग्रामवर ब्लॅक ॲन्ड व्हाईटमधील दोन फोटो शेअर केलं आहेत. यात तिने दुपीस परिधान केला आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात झुमके, गळ्यात भरगच्च दागिने, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लुक पूर्ण केला आहे. यातील खास म्हणजे, अमृताने हा लूक संडे स्पेशल केला असून, यातील एका फोटोत उन्हाच्या किरणापासून वाचण्यासाठी चेहऱ्याच्या वर हात ठेवला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'संडेचा आळस आणि नको ते उन…' अने म्हणत हॅशटॅग #sunday दिला आहे. याआधी अमृताने केशरी रंगाचा टॉप आणि जीन्समध्ये निवांत टाईम्स स्पेंड करताना दिसली आहे. यावेळी तिचा हिवाळ्यातील लूक समोर आला होता. अमृताचे प्रत्येक फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अभिनेत्री सायली संजीवसह अनेक चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. 'Anamika ❤️', 'Same sunday mood?', 'Fabulous Looks ???', 'Beautiful and hot❤️', 'Amuu❤️', 'Nice pic ?', 'Superb ❤️?', 'Absolutely Gorgeous ?', 'ब्लॅक & व्हाईटची जादू वेगळीच', 'Ekdum kadak❤️❤️', 'हा आळस चाहत्यांना वेडा करेल ???', 'Jhakash?', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोंना आतापर्यंत जवळपास ५ तासात २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
हेही वाचा :