सुंदरी  
Latest

‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; नव्या कलाकारांची एन्ट्री

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सन मराठी' वाहिनीवरील 'सुंदरी' ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे या मालिकेची क्रेझ चाहत्याच्यात वाढली आहे. आता या मालिकेचे नवीन पर्व सुरु झाले आहे.

संबंधित बातम्या 

'स्त्री' ने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते हे या मालिकेतील 'सुंदरी' या पात्राने सिध्द करुन दाखवलंय. आपल्या कुटुंबासाठी जगणारी, सर्वांना सांभाळून घेणारी सुंदरी आता तिची एक स्वतंत्र अशी ओळख तयार करणार आहे. सुंदरी फक्त स्वत:च्या करिअरमध्येच एक विशेष स्थान तयार करणार नसून स्वत:च्या आयुष्यातही आईपणाची जबाबदारी पेलणार आहे. सुंदरी आता 'कलेक्टर' म्हणून ओळखली जाणार आणि देशसेवेसोबत अनु आणि आदित्यच्या मुलीची आई हे नातं देखील ती जबाबदारीने पार पाडणार आहे. या दोन्ही जबाबदा-या सुंदरी कशी सांभाळेल? सुंदरीचा पुढील प्रवास मालिकेत नव्या कथेने सुरु झाला आहे.

प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. सुंदरीने लग्न केलं की नाही?, अनु आणि आदित्यच्या मुलीचा सांभाळ सुंदरी का करणार?, अनु आणि आदित्य नेमकं कुठे आहेत?, त्यांच्या बाबतीत काय घडलंय?, त्यांनी त्यांची मुलगी सुंदरीकडे का दिली असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच या नवीन पर्वात उलगडणार आहेत. यामुळे मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या मालिकेचे कथानक नवीन असून नवीन कलाकार मालिकेचा भाग बनणार आहेत. 'सुंदरी'ची भूमिका अभिनेत्री आरती बिराजदार साकारणार असून अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री वनिता खरात हे दोन नवीन कलाकार या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी मालिकेचा सेट कोल्हापूर येथे होता. मात्र, आता मालिकेचा सेट मुंबईला आहे. नवीन कथा, नवीन कलाकार प्रेक्षकांची मालिकाप्रती उत्सुकता वाढवणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT