Hrithik Roshan 
Latest

Hrithik Roshan : एक्स पत्नीसोबत डिनर डेटवर ऋतिक; डिलिव्हरी बॉयमुळे ट्रोल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) एक्स पत्नी सुजैन खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी याच्यासह कुटूंबियासोबत डिनर डेटवर स्पॉट झाला. दरम्यान हृतिक डॉटेलमधून बाहेर येताच एका डिलिव्हरी बॉयने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हृतिकच्या बॉडीगार्ड त्याला जोराचा धक्का दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच हृतिकला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) त्याच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर गेला होता. यावेळी हृतिक आणि पहिली पत्नी सुजैन खान यांची दोन्ही मुले, सुजैनचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी आणि भाऊ झायेद खान देखील गेले होते. रात्रीची जेवण झाल्यानंतर हृतिक हॉटेलच्या बाहेर येताना स्पॉट झाला. यानंतर एक डिलिव्हरी बॉय हृतिकसोबत सेल्फी काढण्यासाठी गेला होता. मात्र, लगेच हृतिकच्या बॉडीगार्डने त्याला धक्का देवून बाजूला केले. यावेळी हृतिकने आणि सुझैन खान ब्लॅक कलरचे एकसारखे कपडे परिधान केले होते.

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी हृतिकला खडेबोल सुनावले आहेत. 'हे सर्व खूपच चुकीचे वागणे आहे?, गरीब माणूसाला कसे ढकलता?, लोक स्वतःला काय समजतात?, हृतिकचे चित्रपट पाहू नका?. फक्त सेल्फी घेणाऱ्या बिचाऱ्याला ढकललात?, हा काय मूर्खपणा आहे. गरीब डिलिव्हरी बॉयला का ढकलले? अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत?, हा कसला अ‍ॅटिड्यूड?. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'फायटर' हा एक मोठा अॅक्शन चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन 'वार' आणि 'पठाण' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, पहिल्यांदाच दीपिका आणि हृतिक रोशनची जोडी दिसणार आहे.

हेही वाचा : 

( video : manav.manglani instagaram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT