जामखेड; पुढारी ऑनलाईन : ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस आणि दुचाकीस्वाराच्या धडकेत जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील रामदास मिसाळ (वय ४८ ) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बीड – नगर महामार्गावरील धानोरा गावाजवळ घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रामदास मिसाळ हे सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जामखेडहून नगरकडे जात असताना बीड-अहमदनगर महामार्गावरील धानोराजवळ गाडीला ओव्हरटेक करत असताना पुण्याहून नांदेडला जात असलेली शिवशाही बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.