जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Accident) मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर्स अपघातांच्या घटनांचे पुन्हा एकदा स्मरण झाले आहे. आतापर्यंत वाय. एस. राजशेखर रेड्डी, संजय गांधी, माधवराव शिंदे, जी.एम.सी. बालयोगी, एस. मोहन, कुमारमंगलम, ओ.पी. जिंदल आणि अरुणाचल प्रदेशचे दोरजी खांडू या बड्या नेत्यांसह लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा हेलिकॉप्टर आणि विमान अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे.
23 नाव्हेंबर 1963 मध्ये जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 6 अधिकार्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लेफ्टनंट जनरल दौलत सिंह, लेफ्टनंट जनरल विक्रम सिंह आणि एअर व्हाईस मार्शल अरलिक पिंटो यांचा समावेश होता.
31 मे 1973 मध्ये काँग्रेस नेते मोहन कुमार मंगलम् यांचा विमान अपघातात मृत्यू
23 जून 1980 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू दिल्लीतील सफदरगंज विमानतळाच्या नजीक झाला होता. संजय गांधी स्वतःचे विमान उडवत होते.
2001 मध्ये अरुणाचल प्रदेशचे शिक्षणमंत्री नटुंग यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात काँग्रसेचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला खराब वातावरणामुळे अपघात झाला होता. त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला होता.
3 मार्च 2002 मध्ये लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांच्या बेल 206 हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर एका तलावात उतरवण्यात आले होते.
पवन हंस या हेलिकॉप्टरमधून गुवाहाटीहून शिलाँगला जात असताना झालेल्या अपघातात सप्टेंबर 2004 मध्ये माजी केंद्रीय मंत्री सी. संगमा यांचे निधन झाले होते.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने 31 मार्च 2005 मध्ये हरियाणाचे माजी मंत्री ओ.पी. जिंदाल यांचा मृत्यू झाला होता.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका जंगलात 3 सप्टेंबर 2009 मध्ये आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.चंद्रशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये रेड्डी यांचे निधन झाले होते. त्यांचा मृतदेह 27 तासांनी मिळाला होता.
2011 मध्ये अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह अनेक दिवसांनी मिळाला.