file photo 
Latest

Eknath Shinde: राष्ट्रपतींच्या विदर्भ दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी; चर्चांना उधाण

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या तीन दिवसांच्या नागपूर, विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही एकत्रितपणे नागपुरात पोहोचले. मात्र, राष्ट्रपतींचे विमानतळावर आणि यानंतर राजभवनमध्ये स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ते आज राष्ट्पतींच्या गडचिरोली आणि नागपूर दौऱ्यातही न आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

रात्री शिवसेना नेते आमदारांची एक बैठक मुंबईत दीपक केसरकर यांच्या 'रामटेक' या निवासस्थानी होती. या बैठकीत तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरची अस्वस्थता पाहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ही बैठक आधीच ठरलेली असल्यामुळे ते मुंबईला परतल्याचे शिंदे समर्थक सांगत असले तरी राष्ट्रपतींच्या दौऱ्यात गडचिरोली व कोराडीला मुख्यमंत्री (Eknath Shinde) प्रोटोकॉलनुसार हजर राहणे आवश्यक असताना ते अचानक का परतले ? यावरून सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडी लक्षात घेता चर्चेला उधाण आले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री परत येणार असल्याचेही सांगितले गेले. मात्र, कधीकाळी पालकमंत्री व विशेष प्रेम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्पतींच्या दौऱ्यातही ते आले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दृष्टीने महत्वाच्या कोराडी येथील कार्यक्रमातही ते येणार नाहीत, असे स्पष्ट झाल्याने यापेक्षा मुख्यमंत्री कुठल्या महत्वाचे कामात आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा समावेश होताच मंत्रीपदे मिळाली, शिंदे गट अजूनही मिनिस्टर इन वेटिंग.. असल्याने आपल्या समर्थकांना सांभाळण्याचे, ज्या राष्ट्रवादी सोबत सतत वाद केला त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने शिंदे गटात चर्चेत असल्याने अजूनही राज्याच्या राजकारणात बरेच काही बाकी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT