Latest

Abhishek Ghosalkar Case : अभिषेकला विश्वासघाताने संपवले, आमची बदनामी थांबवा : विनोद घोसाळकर

अनुराधा कोरवी

दहिसर : वार्ताहर ;  माझ्या मुलाची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना अश्लाघ्य व बिनबुडाचे आरोप करून माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, असे निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केले आहे. ( Abhishek Ghosalkar Case )

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर विनोद घोसाळकर यांनी निवेदन काढले. '1982 पासून मी सक्रिय राजकारणात आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले. मी मुंबईत नगरसेवक व नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेही नगरसेवक राहिले. जनतेचे प्रेम आणि विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही, असे घोसाळकर यांनी म्हटले आहे.

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. मात्र बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. ( Abhishek Ghosalkar Case )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT