Latest

आणि मुलीच्या प्रेमात वेडा झालेल्या आमिरने केलं चक्क टक्कल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या आमिर खान भलताच चर्चेत आहे. याला कारण आहे नुकताच येऊ घातलेला 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमा. या सिनेमाला बॉयकॉट करा म्हणून सोशल मीडियावर ॲक्टिव असलेला एक वर्ग आहे. तर याच्या विरोधात आमिरच्या पाठीशी उभा राहिलेलाही एक वर्ग आहे. अनेक कलाकारांनीही आमिरच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. पण या सगळ्यात आमिरबाबताच्या अनेक बातम्याही चर्चेत येताना दिसत आहेत.

आज मिस्टर परफेक्शनिस्टच बिरुद मिरवणारा आमिर कोणे एके काळी रील लाईफ इतकाच रिअल लाईफमध्येही दिलफेक आशिक होता. आमिरच्या या रिअल लाईफ आशिकीचा एक किस्सा मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने त्याच्या या अतरंगी लव्ह लाईफबाबत खुलासा केला आहे. आमिर त्याच्या भूमिकांप्रमाणेच दिलफेक आशिक होता. तर किस्सा असा आहे की आमिरला एक मुलगी आवडत होती. चॉकलेट बॉय असलेल्या या मुलाने तिला प्रपोजही केलं होतं. पण त्या मुलीने आपल्या या हीरोला नकार दिला.

मग की नकार मिळाल्यावर अस्वस्थ झालेल्या या मुलाने चक्क टक्कल केलं. खरं तर हीरो होण्यासाठी आलेल्या या मुलाने तडका-फडकी टक्कल करणं म्हणजे त्यावेळी मोठी गोष्ट होती. त्याचदरम्यान 1984 मध्ये रिलीज झालेला त्याचा पहिल्या वहिला सिनेमा होतं 'होली'. विशेष म्हणजे या सिनेमातील त्याच्या हटके हेअर स्टाईलची चर्चाही खूप होती. त्यावेळी भूमिकेची गरज असं मोघम उत्तर आमिरने माध्यमांना दिलं असलं तरी त्यावेळेची खरी गोष्ट ही आमिरचं ब्रेक अप हीच होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT