पुढारी ऑनलाईन डेस्क : लाल सिंग चढ्ढाच्या अपयशानंतर मागील काही दिवस आमिर खान सध्या अभिनय जगतापासून पळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर (Aamir Khan) नुकताच दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ऑफिसबाहेर दिसला. त्याचा हा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आमिरचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोंमध्ये काळे केस आणि लहान दाढी असा अमिरचा लुक आहे. झोयाच्या ऑफिसबाहेर तो ग्रे स्वेट शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसून आला. नवीन लूकमध्ये आमिरने दिलेल्या पोजची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आमिर खानसाठी २०२२ हे वर्ष खडतर होते. मागील वर्षी त्याचा बहुचर्चित लाल सिंग चड्ढा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला. मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट त्याची किंमत वसूल करण्यात अयशस्वी ठरला. या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरला मोठा धक्का बसला होता. यामुळेच यानंतर काही काळ त्याने अभिनयापासून दूर राहण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा :