Latest

अहो आश्चर्यम्! एकाच घरात २२ मुले!

Arun Patil

लंडन : कोणत्याही महिलेसाठी मातृत्वाचा अनुभव सर्वात सुखद असतो. मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्यात ती आपली हयात आनंदाने व्यतीत करते. सध्याच्या धावपळीच्या युगात एक-दोन मुलांचा सांभाळही दमछाक करणारा असतो. पण, एखाद्या महिलेला दोन-चार नव्हे तर चक्क 22 मुले असतील, तर ती आई या सर्वांना कशी सांभाळत असेल, याचा विचारही थक्क करायला लावणारा आहे.

ब्रिटनमधील लँकेशायर येथे राहणार्‍या सुए या महिलेने सोशल मीडियावर आपल्या घरातील नाश्त्याचे एक छायाचित्र पोस्ट केले आणि हा अजब किस्सा प्रकाशझोतात आला. आपल्या 22 मुलांसाठी तिने पॅनकेक्स व चॉकलेट पेस्ट्रीजचा डोंगर रचल्याचे या छायाचित्रात दिसून आले. शिवाय, ख्रिसमसची तयारी घरी कशी सुरू आहे, याचीही झलक तिने शेअर केलेल्या काही छायाचित्रात अधोरेखित झाले.

सुएने पती नोएलसह 1989 मध्ये आपल्या पहिल्या आपत्याचे स्वागत केले आणि त्यानंतर सर्वात छोट्या मुलीचा अगदी अलीकडे म्हणजे एप्रिल 2020 मध्ये जन्म झाला. या दोन मुलांमध्ये चक्क आणखी 20 मुले आहेत. या भल्यामोठ्या परिवारासाठी रेशनवरदेखील लाखोंच्या घरातील खर्च आहे. याशिवाय, घराचे काम करता करता सुएला स्वत:साठी अजिबात वेळ देता येत नाही. सुएच्या सर्वात मोठ्या कन्येलाही एक आपत्य आहे. सुएच्या मताप्रमाणे तिचे हे कुटुंब अ‍ॅड ऑन पद्धतीचे आहे.

सुए आपल्या या भल्यामोठ्या कुटुंबाची काही छायाचित्रे अलीकडे शेअर करत असते. मध्यंतरी तिने हे थांबवले होते. पण, ख्रिसमसच्या तयारीचे वेध लागले असताना तिने काही छायाचित्रे पुन्हा पोस्ट केले आणि ही एकूण 24 जणांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT