Hrithik Roshan  
Latest

Hrithik Roshan : ऋतिक- सबा आझादचे कारमध्ये लिपलॉक; म्हणाले, सबा नेमकी कोणाची गर्लफ्रेंड?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार ऋतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबतच्या अफेअरमुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. दरम्यान ऋतिक आणि सबा दोघे लंडनची सफर करत फोटो शेअर केले होते. यानंतर ऋतिक पहिल्या पत्नीपासून विभक्त होवून अभिनेत्री सबा आझादच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे बोलले जात होते. तर सध्या ऋतिक आणि सबा लिपलॉक व्हिडिओने पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. दोघांच्या या व्हिडिओवर कमेन्टसचा पाऊस पडला आहे.

अभिनेता ऋतिक रोशन ( Hrithik Roshan ) आणि सबा आझाद लिपलॉक करतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हृतिक आणि सबा एका कारमधून मुंबईच्या विमान तळावर स्पॉट झाले. यावेळी ऋतिकने ग्रे कलरच्या टीशर्ट- जॅकेट, टोपी, चष्मा आणि ब्लॅक कलरच्या पॅन्टमध्ये दिसलाय. तर सबा आझादने पिस्ता कलरचा ट्राऊजर परिधान केला आहे.

हृतिक मुंबईच्या विमान तळावर ब्ल्यू कलरच्या कारमधून येतो आणि कारमध्ये असलेली गर्लफ्रेंड सबा आझादला किस करून लिपलॉक करताना दिसतोय. यानंतर थोड्या वेळाने हृतिक विमान तळाच्या दिशेने जाताना दिसतो. यावरून हृतिकला विमान तळावर सोडण्यास सबा आल्याचे समजते. मात्र, शेवटी सबाने दुसऱ्या एका व्यक्तीला हग करताना दिसली. यावरून चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. यावेळी काही बॉडीगार्डदेखील तिच्या सोबत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'हृतिकची गर्लफ्रेंड ??' असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'But usne kisi or ko hug kia why ?', 'नेमकी कोणाची गर्लफ्रेंड आहे?', 'कोणाला सोडायला आली आहे?', 'फायटर चित्रपटाचे शुंटिग सुरू झालं काय?', 'हृतिकचा जिम ट्रेनर आहे काय?' यासारखे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT