पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आयशर टेम्पोच्या धडकेत एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश विष्णू फुंदे (वय 19) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकाळी नऊ वाजता फुंदे टाकळी शिवारात ही घटना घडली. ऋषिकेश फुंदे मोटारयाकल घेऊन किराणा सामान आणायला चालला होता. रस्त्यावर प्रशांत फुंदे भेटल्याने तो बाजूला गाडी उभी करून त्याच्याशी बोलत होता. तेवढ्यात पाथर्डीकडून आलेला आयशर टेम्पोने (क्रंएमएच 12 एमडी 687) उभ्या असलेल्या मोटारसायकलला विरोधी दिशेला येऊन जोरदार धडक दिली.
यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला. प्रशांत फुंदे याने तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. गंभीर जखमी ऋषिकेश फुंदे याला पाथर्डीच्या दवाखान्यात आणले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो घेऊन पसार झाला. फुंदे टाकळी ग्रामस्थांनी रस्ता अडवून तीव्र भावना व्यक्त करीत रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली. पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :