पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे ( Jharkhand ) मुख्यमंत्री हेमंत सोरेन ( CM Hemant Soren ) यांच्यासाठी आज (दि.२०) महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्यांची चौकशी करणार आहे. ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीमुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी वाढली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ( Jharkhand land scam case)
रांचीमध्ये लष्कराने ताब्यात घेतलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे प्रकरणी ईडीने रांचीच्या बडगई भागातील महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली. भानू प्रताप प्रसाद यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रे सापडली आहेत. यासोबतच त्याच्या मोबाईलमधून अनेक संशयास्पद कागदपत्रेही सापडली आहेत. ईडी मुख्यमंत्र्यांची कागदपत्रांची छाननी आणि त्यांच्याशी संबंधित तथ्यांची पडताळणी करण्याबाबत चौकशी करत आहे. ( ED officials arrives at the residence of Jharkhand CM Hemant Soren)
या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्र्यांना सात वेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीच्या आठव्या समन्सवर मुख्यमंत्र्यांनी ईडीला चौकशीसाठी २० जानेवारीची मुदत दिली आहे. 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने राज्य पोलीस मुख्यालयाला पत्र लिहून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे आदेश दिले होते. ( ED officials arrives at the residence of Jharkhand CM Hemant Soren)
हेही वाचा :
.