Latest

लग्‍नानंतरचे धक्‍कादायक वळण; नवऱ्याकडून घटस्‍फोट, आता ‘ती’ अभिमानाने वाढवते दाढी!

Arun Patil

अमृतसर : पंजाबमधील मनदीप कौर या महिलेला आयुष्यातील अनेक धक्कादायक वळणे पाहावी लागली आहेत. लग्नापूर्वी व लग्नाच्या वेळी ती एखाद्या सर्वसामान्य महिलेसारखीच होती. लग्न थाटामाटात झाले, संसारही सुरू झाला; पण लग्नानंतर अचानक तिच्या चेहर्‍यावर केस उगवू लागले. तिला अशी दाट मिशी व दाढी येऊ लागल्यानंतर स्थिती बदलली व नवर्‍याने तिला घटस्फोट दिला. मात्र, यामुळे खचून न जाता तिने आयुष्यातील हे अनोखे स्थित्यंतर स्वीकारले आणि आता ती आपली दाढी अभिमानाने मिरवत आहे!

अचानक या दाढी-मिशा आल्यामुळे ती अर्थातच तणावात गेली होती. संसारातही वादळ उठले आणि नवरा सोडून गेला. त्यामुळे ती खचूनही गेली होती. मात्र, लवकरच तिने हा बदल स्वीकारला आणि ही देवाचीच देणगी आहे असे ती मानू लागली. 2012 मध्ये लग्न करण्याआधी तिच्या चेहर्‍यावर एकही केस नव्हता. मात्र, त्यानंतर तिला दाढी-मिशा येऊ लागल्या. त्यानंतर तिचा घटस्फोट झाला व मनःस्थिती सुधारण्यासाठी ती गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना करू लागली. हा देवाचा आशीर्वाद आहे असे समजत आता तिने हा बदल स्वीकारला आहे. आपली दाढी आणि मिशी हे आपलं 'बेस्ट फीचर' असल्याचे ती सांगते. ती आता पगडीही घालते आणि पुरुषांप्रमाणे बाईक व अन्य वाहनेही चालवते. 34 वर्षांची मनदीप शेती करून उपजीविका करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT