केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात अजब प्रकार घडकीस आला आहे. एका आजारी व्यक्तीवर आयुर्वेदिक औषधोपचार करणाऱ्या आणि स्वतःला महाराज म्हणविणाऱ्या ठगाने आजारी व्यक्तीची अल्पवयीन मुलगी पळवून नेली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका आजारी व्यक्तीला झाडपाला व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यासाठी घरी येत असणाऱ्या एका भामट्याने आजारी वडिलांची देखभाल व शुश्रूषा करणारी मुलगी ही पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता तिला फूस लावून त्याच्या चारचाकी वाहनातून. ( क्र. एम एच-१६/ए जे-६५००) पळवून नेली आहे.
ही घटना त्या अल्पवयीन मुलीच्या चुलत्याने पहिली. त्यांनी त्या भामट्या महाराचा पाठलाग करून शोध घेतला मात्र मुलगी आणि महाराज आढळून आला नाही.
अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारी वरून बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव (ता. केज) येथील पोलीस ठाण्यात माउली धोडीराम भोसले महाराज (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्या भामट्याचा शोध स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे हे घेत आहेत.
अधिक वाचा :