Bruce Lee’s death 
Latest

 Bruce Lee’s death : ४८ वर्षानंतर अभिनेता ‘ब्रूस ली’च्या निधनाचे नवीन कारण आले समोर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन मार्शल आर्ट दिग्गज आणि हॉलिवूड अभिनेता 'ब्रूस ली'चं निधन (Bruce Lee's death) वयाच्या ३२ व्या वर्षी झाली. त्याने जगाला मार्शल आर्ट्सला जगभर ओळख करुन दिली. 20 जूलै 1973 रोजी त्याचे निधन झाले. डॉक्टरांच्या माहितीनुसार मेंदुला सूज (सेरेब्रल एडेमा) आल्याने त्याचा मृत्यू झाला. पण 'ब्रूस ली' च्या निधनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचा मृत्यू हा जास्त पाणी पिल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाचा सविस्तर बातमी.

आपल्या अभिनयाने आणि  मार्शल आर्टस् ने मनोरंजन विश्वात आपली एक ओळख केलेला अभिनेता म्हणजे 'ब्रूस ली' (Bruce Lee). वयाच्या ३२ व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्याचा मृत्यू मेंदुला सूज (सेरेब्रल एडेमा) आल्याने झाला, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. पण तरीही त्याचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याबद्दल नेहमी काही ना काही नवीन ऐकायला मिळायचं. पण तुम्हाला वाटत असेल         'ब्रूस ली'च्या निधनानंतर ४९ वर्षांनी त्याच्या मृत्यूबद्दल का चर्चा सुरु आहे. तर 'ब्रूस ली'चा मृत्यू कसा झाला हे समोर आलं आहे. 'ब्रूस ली' चा मृत्यू हा जादा पाणी पिल्याने झाला आहे. क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये (Clinical kidney journal) असं सांगण्यात आलं आहे की, 'ब्रूस ली' चा मृत्यू हा हाइपोनाट्रेमिया (hyponatraemia) आजारामुळे झाला होता. हा आजार शरीरात जास्त पाणी असल्याने होतो.

Bruce Lee's death

Bruce Lee's death : काय आहे हाइपोनाट्रेमिया 

'ब्रूस ली'च्या मृत्यूबाबतीत समोर आलेल्या नव्या अहवालात असं म्हंटल आहे की, 'ब्रूस ली'चा मृत्यू हाइपोनाट्रेमिया (hyponatraemia) आजारामुळे झाला होता. हा आजार तेव्हा होतो जेव्हा मानवी रक्तात सोडीयमच प्रमाण खूप कमी होते. रक्तातील सोडीयमचं प्रमाण तेव्हाचं कमी होते जेव्हा पाणी शरीरात जास्त होते. सोडीयम पाण्यात सतत विरघळतं. त्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये सूज येते. 

अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन

संशोधनातून असेही दिसून आले की ब्रूस ली अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन करायचा. ज्यामुळे त्याला हायपोनेट्रेमिया होण्याची शक्यता होती. या परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक तहान लागते. असा दावाही करण्यात आला होता की, तो भांग आणि अल्कोहोल सारख्या ड्रग्समध्ये मिसळलेले द्रव पित असावा. यामुळे किडनी योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि नंतर फिल्टर करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला.

'ब्रूस ली'ची किडनी खराब झाली होती

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा 'ब्रूस ली'चा मृत्यू झाला तेव्हा त्याची किडनी खराब झाली होती आणि त्यामुळेच ते पीत असलेले पाणी फिल्टर होत नव्हते. अशा स्थितीत त्यांच्या अंगात पाणी भरले होते. या स्थितीत शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे निधन झाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT