मेबॅक कार 
Latest

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान मेबॅक कार झाली ८७ वर्षांची; जाणून घ्या वैशिष्ट्ये

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर : जगप्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूच्या शाही दसऱ्यातील मेबॅक कार लोकांच्या आकर्षणाचा विषय असतो. नवरात्रौत्सवांतर्गत विजयादशमीला होणाऱ्या सीमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे (हुजूर स्वाऱ्या) या मेवॅकमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होते.

जर्मनीचा हुकूमशहा व लढवय्या सेनानी अॅडॉल्फ हिटलर अशीच मेक गाडी वापरायचा, यामुळे या गाडीला 'हिटलर रोल्स' म्हणूनही ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मेकचे उत्पादन बंद पडले. यामुळे जगभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सेवक कार शिल्लक आहेत. यापैकी एक आपल्या कोल्हापुरात असल्याचा सर्वांना अभिमान आहे.

काळानुरुप दसरा सोहळ्यातही मोठे बदल झाले. पूर्वीच्या दारा मिरवणुकीतील हत्ती-घोडे-उंट या लवाजम्यातील वाहनांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली. यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील हत्तीच्या रथाची जागा छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात मेबॅक कारने घेतली. यामुळे ही मेबॅक कार आजही कोल्हापुरच्या शाही दसऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.

छत्रपतींचा सन्मान…

छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील मेबॅक कारचे जतन पुढे छत्रपती शहाजी महाराज यांनी केले. कोल्हापुरातील मेबॅक गाडीला मिळालेला मान पाहून उत्पादक कंपनाने काही वर्षापूर्वी कोल्हापुरातील मेबॅकची नोंद कंपनीच्या वाटचालीच्या इतिहासात घेतली आहे.

मेबॅक कारची वैशिष्ट्ये…

छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन १९३६ च्या सुमारास इंग्लंड येथील 'रोल्स राईस' या कंपनीला मेबॅक गाडी बनविण्याची ऑर्डर दिली. कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या ध्वजाचा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का (मोर्तब), शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅकवर एकवटली आहेत. गाडीचा मूळ क्रमांक (वीवायएफ ८७७६) हा असा होता. मात्र, कोल्हापुरात आणल्यानंतर या गाडीचा क्रमांक कोल्हापुर १' असा करण्यात आला. मेवॅक १७ फूट लांब ६ फूट रुंद असून यात ६ लोक ऐसपैस बसू शकतात. हाताच्या बोटाने ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम, २०० लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक, रेल्वेच्या शिटीसारखा पण कर्णकर्कश नसणारा हॉर्न, उन्हाचा त्रास न होणाऱ्या टिटेड ग्लासच्या काचा अशा छोट्या- छोट्या वैशिष्ट्यांनी सेवक परिपूर्ण वनविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT