लोणावळा : लोणावळ्यात कार पार्क करताना वडिलांच्या गाडीखाली सापडून 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी 2.40 च्या सुमारास लोणावळ्यातील ऑर्चिड हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली. किआंश किरण माने (वय 3, रा चिखली, सानेचौक, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दीपक शिवाजी वारंगुळे (वय 28, रा. भोसरी, गव्हाणेवस्ती) यांनी लोणावळा शहर पोलिसांत खबर दिली आहे. रविवारी दुपारी लोणावळा येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या हॉटेल ऑर्चिडच्या पार्किंगमध्ये किरण माने हे कार (एमएच 14 जेएम 9000) पार्क करत असताना गाडीपुढे खेळणारा किआंश याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचा तपास पोलिस हवालदार मडके करत आहेत.