नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणामध्ये शिक्षा ठोठावणारे सुरत न्यायालयाचे न्यायाधीश हरीश वर्मा यांच्या बढतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. नुकतेच न्या. वर्मा यांची राजकोटचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून बढती करण्यात आली आहे. गुजरात सरकारने कायदा विभागाच्या माध्यमातून ६८ न्यायामूर्तींची बदली तसेच बढती केली होती. न्या.वर्मा यांच्यासह ६८ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बढतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती एमआर शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठसमोर या प्रकरणावर सोमवारी (दि. ८) सुनावणी घेण्यात येईल.
६५ टक्के कोटा नियमाच्या आधारावर ६८ न्यायमूर्तींना बढती देण्यात आली आहे. सिनियर सिव्हिल जज कॅडरचे दोन अधिकारी रविकुमार महता तसेच सचिन प्रतापराय मेहतांनी याला आव्हान दिले आहे.१० मार्चला गुजरात उच्च न्यायालयाने जारी केलेली यादी तसेच राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीसंदर्भात काढलेली नियुक्तीची अधिसूचना रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी पात्रता तसेच वरिष्ठतेच्या आधारावर नवीन यादी तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचा