Latest

Vehicle License : वाहन परवान्यासाठी दिल्या 960 चाचण्या!

Arun Patil

सेऊल : दक्षिण कोरियातील एका महिलेला वाहन परवाना मिळवण्यासाठी म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी तब्बल 960 टेस्ट द्याव्या लागल्या. त्यानंतर अखेर तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली व तिला लायसेन्स मिळाले!

चा सा सून नावाची ही महिला राजधानी सेऊलपासून 130 मैलांवर राहते. या महिलेचा संयम आणि हार न मानण्याची तिची क्षमता जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण एखादे काम 8-10 वेळा करून सोडून देतो; पण या महिलेने सलग तीन वर्षे दर आठवड्याला 5 वेळा ड्रायव्हिंग टेस्ट देणे सुरू ठेवले. इतकी वाट पाहिल्यानंतर आणि एवढी मेहनत केल्यावर अखेर तिला लायसेन्स मिळू शकले. चा सा सूनने एप्रिल 2005 मध्ये पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्टसाठी लेखी परीक्षा दिली होती.

यात नापास झाल्यानंतर तिने पुन्हा 780 वेळा परीक्षा दिली. ती पास होईपर्यंत आठवड्यातून दोनदा तिच्या परीक्षा होत असत. त्यानंतर प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल टेस्ट सुरू झाली. यात उत्तीर्ण होण्यासाठी तिला आणखी 10 प्रयत्न करावे लागले. म्हणजेच एकूण 960 वेळा परीक्षा झाल्यावर चा सा सूनला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकले. आता ती 69 वर्षांची आहे. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेत महिलेने 11,000 पौंडापेक्षा जास्त म्हणजेच 11 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला, तेव्हा तिला परवाना मिळू शकला.

भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी तिला या लायसेन्सची गरज होती, जेणेकरून ती लॉरी चालवू शकेल. तिची कहाणी व्हायरल झाल्यानंतर तिला दक्षिण कोरियन वाहन कंपनीने एक नवीन वाहनदेखील दिले आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. एवढंच नाही तर वाहनाच्या जाहिरातीतही तिला दाखवलं जाणार आहे. महिलेला लायसेन्स मिळाल्यानंतर तिचा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर सर्वाधिक खूश आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT