Latest

84 लाख शब्द, 3 लाख ओळी, 8652 पानांचे विक्रमी रामनाम पुस्तक!

Arun Patil

सतना : एका अनोख्या रामभक्ताने 84 लाख शब्द, 3 लाख ओळी, 8652 पानांचे पुस्तक लिहित गिनीज रेकॉर्डमध्ये स्थान संपादन केले आहे. हे पुस्तक 1428 मीटर लांब आहे आणि त्याचे वजनही थोडेथोडके नव्हे तर 65 किलो इतके आहे.राकेश साहू असे या रामभक्ताचे नाव आहे.

राकेश साहू सतना येथे  एक बनारस भोजनालय चालवतात. 2005 मधील दिवाळीत त्यांनी राम नाम लेखन सुरू केले. 13 वर्षांनंतर त्यांनी 2017 मध्ये 84 लाख राम नाम लेखन करत गिनीज बुकमध्ये सर्वप्रथम स्थान मिळवले. आता ही शब्द संख्या कोटीच्या उड्डाणे पोहोचली आहे.

रामभक्तीत तल्लीन या भक्ताचा 1 कोटीहून अधिक वेळा राम नाम लेखन केल्याचा दावा आहे. यासाठी त्यांनी 1428 मीटर्स पेपरचा वापर केला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आता सर्वात लांब पेपर आर्टमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. या बुकमुळे राकेश साहू यांच्या घरातील एक खोली भरले आहे. सदर बुक 8 वेगवेगळ्या भागात नीटनेटके ठेवले गेले असून, जगातील हा सर्वात मोठा रामनाम लेखन प्रपंच असल्याचा त्यांचा दावा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT